‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST2018-03-27T01:02:39+5:302018-03-27T01:02:39+5:30

माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.

In the DGP Nagar courtyard for 'Network' | ‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

‘नेटवर्क ’साठी डीजीपीनगरवासीय अंगणात

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाइल नेटवर्क पुरविणाºया सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात ओरड होत आहे.  डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचाºयांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाइल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकु वतरीत्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगर येथील घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाइल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरूपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहेत. ज्या कंपनीचे सीमकार्ड वापरले जात आहे, त्या कंपनीच्या ग्राहक सेवा अधिकाºयांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिक सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकिरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेटचा वापर व त्यासाठी लागणाºया ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.
मोबाइल चोरी जाण्याच्या घटना
मोबाइलला रेंज मिळत नाही म्हणून डीजीपीनगरवासीयांना घराच्या खिडकीमध्ये मोबाइल ठेवावा लागतो. त्यामुळे मोबाइल अलगदपणे चोरट्याकडून खिडकीमधून लंपास केले जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. चोरट्यांनीही डीजीपीनगर भागाकडे आपली दृष्टी फिरवली असून, मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेंज मिळविण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. मोबाइलची बॅटरी संपुष्टात येते. काही नागरिक मोबाइल चार्जिंगला लावून खिडक ीमध्ये ठेवतात. दिवसभर घरात महिला कामामध्ये असतात, अशावेळी चोरट्यांकडून मोबाइल लंपास केले जाते.
अशोकामार्गावरही समस्या
डीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या अशोकामार्ग परिसरातही मोबाइल नेटवर्कची समस्या काही महिन्यांपासून भेडसावत असल्याने नागरिकही वैतागले आहेत. नेमक्या कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे यक्षप्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प आहेत. फ्लॅटमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरूनही मोबाइल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
...तुमचा फोनच लवकर लागत नाही’
डीजीपीनगरवासीयांचा मित्रपरिवार, नातेवाइकांकडून सध्या एकच वाक्य मागील काही दिवसांपासून त्यांच्या कानी पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही.’ जोपर्यंत मोबाइल खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही.यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

Web Title: In the DGP Nagar courtyard for 'Network'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल