शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

शिव मंदिरे भक्ताविनारिक्त वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:36 IST

लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी :तालुक्यातील श्रावणामधील नवलाईला कोरोनाचा मज्जाव

लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे.श्रावण महिन्यात भगवान शंकराची मोठ्या प्रमाणात पुजा केली जाते. त्यामुळे भाविक, भक्तांची एक पर्वणीच असते. त्यामुळे सर्वच शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते.तालुक्यात असे अनेक पुरातन शिव मंदिरे आहे. त्यामध्ये दिंडोरी येथील रामेश्वरी शिव मंदिर, वरखेडा येथील रामेश्वर शिवलिंग मंदिर, देऊळदरा येथील पुरातन मंदिरे, कोशिंबे येथील भद्रेश्वर शिव मंदिर, आंबेगण मधील शिवजी मंदिर, कंरजीमधील शिव मंदिर, राजापूर येथील हेमापंथी शिव मंदिर व तालुक्यात सर्वांत महत्वाचे मंदिर म्हणून ननाशी जवळ असणारे देवघर येथील अतिशय पुरातन महादेव मंदीर आहे.ननाशी जवळ पुरातन मंदिर हे आज ही देवस्थान मानले जाते. शिवरात्री व श्रावण महिन्यात या ठिकाणी लाखो भाविकांची हजेरी लागत असते .हे शिव स्थान अतिशय प्राचीन मानले जाते. श्रावणात या तिर्थक्षेत्रावर महापुजा, सत्यनारायण, अभिषेक, कायम स्वरु पी होत असतात. त्यामुळे हे तिर्थक्षेत्र भक्तांची आशा पुर्ण करणारे मानले जाते.दिंडोरी तालुक्यातील हे सर्व शिव मंदिरे अतिशय प्राचीन मानले जातात. त्यामुळे श्रावणात या तिर्थक्षेत्राला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही सर्व तिर्थक्षेत्र कोरोनामुळे बंद ठेवण्याचे आदेश आल्यामुळे श्रावण महिन्यात सर्वच मंदिरे बंद आहेत. यामुळे यंदा श्रावणाच्या पर्व काळात भगवान शिवाचे दर्शन घेणे शक्य नाही. कयामुळे सर्व शिव भक्त व्याकुळ झाले आहे. कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यामधील श्रावणमासातील नवलाई हिरमूसली आहे.प्रतिक्रि या...मी गेली अनेक वर्षांपासून श्रावण मिहना आला की अनेक शिव मंदिरे दर्शनासाठी अखंड जात असतो.आज पर्यंत ?? वर्ष पुर्ण झाली. परंतु यंदा मात्र कोरोना च्या साथीने माझी यंदा अनेक ठिकाणच्या शिव दर्शन केल्यामुळे माझी अवस्था लहान बालका प्रमाणे झाली आहे.- निवृत्ती बाबा जाधव (शिव भक्त)

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTempleमंदिर