भाविक, पर्यटकांची त्र्यंबकेश्वरला मांदियाळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:07 IST2020-01-05T00:07:01+5:302020-01-05T00:07:26+5:30
त्र्यंबकेश्वर नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर्शनव्यवस्थाच कोलमडली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानविषयी तक्र ारी वाढल्या असून, त्यांनी प्रशासनात सुधारणा करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. काही भाविकांनी ‘बहोत तीर्थक्षेत्र देख चुके है, लेकीन त्र्यंबक जैसा कोई नही. दर्शन की व्यवस्था बहोत बेकार है, इसके आगे हम त्र्यंबकेश्वर नही आयेंगे,’ असे म्हणून निघून जाताना दिसून आले.
त्र्यंबकेश्वर : नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर्शनव्यवस्थाच कोलमडली आहे.
दर्शनार्थी व पर्यटकांची गर्दी वाढल्याने गावातील व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. पूर्वदरवाजाने दर्शन घेणाऱ्या दर्शनार्थींच्या रांगा थेट गोरक्षनाथ मठाच्याही पुढे जात आहेत, तर देणगी दर्शनाच्या रांगाही थेट भारतीय स्टेट बँकेच्या पुढे जात आहेत. धार्मिकतेने घेण्यात येणारे दर्शन व पर्यटकांच्या गर्दीने ब्रह्मगिरी, गंगाद्वार व नीलपर्वत बहरले आहेत. या ठिकाणी जाणाºया भाविक, पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी रिक्षा व वाटाडे यांचीही सध्या चलती आहे. याच गर्दीत त्र्यंबकेश्वर येथे बालयोगी श्री सदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वरी पारायण समिती, तुंगारेश्वर, ता.वसई, जि.पालघर व श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान समिती यांच्या सहकार्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम महोत्सव सुरू झाला असल्याने हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल झाले आहेत. यामुळे गर्दीत वाढ झाली असून, नगरीत जणू भावभक्ती व ज्ञानाचा कुंभमेळा भरला आहे.
, असे वाटत आहे.