गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी वटार परिसर फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:41 IST2019-04-16T16:41:04+5:302019-04-16T16:41:28+5:30

वटार : साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाºया गडाकडे पायी जाणाºया नंदुरबारकडील भक्तांची रीघ लागली आहे. सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डफ वाजवित जाणाºया भाविकांमुळे वटार परिसर भाविकांनी फुलला आहे.

 The devotees from the fort rushed to the fort | गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी वटार परिसर फुलला

 गडाकडे जाताना भाविक. 

ठळक मुद्देभाविकांच्या गर्दीमुळे गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. तरु णाईचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने भक्त मोठ्या उत्साहात प्रसादाचा आस्वाद घेत ‘मायना गड वना’ या गाण्यावर ठेका घेत गडाची वाट चालत आहेत.


वटार : साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाºया गडाकडे पायी जाणाºया नंदुरबारकडील भक्तांची रीघ लागली आहे. सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डफ वाजवित जाणाºया भाविकांमुळे वटार परिसर भाविकांनी फुलला आहे.
श्रद्धा व भक्तीच्या प्रवाहात सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी नंदुरबार, साक्र ी, शहादा व परिसरातील भाविकांनी सप्तशृंगगडाकडे जाण्याची वाट धरली आहे. उन्हात अनवाणी पायांनी चालणारे भाविक गावात येताच पिण्याच्या पाण्याची, हातपाय धुण्याची व चहाची सोय केली आहे. यामध्ये गावातील स्वयंसेवक सालाबादप्रमाणे आपले काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून गावात येणाºया भाविकांसाठी गावात भंडारा चालू असून, प्रत्येक पायी जाणाºया भाविकाला प्रसाद दिला जात आहे. रणरणत्या उन्हात आबालवृद्ध जिवाची पर्वा न करता एक एक पाउल पुढे सरकणाºया भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद जणू काही नवी ऊर्जा निर्माण करतो. गेल्या वीस वर्षांपासून न चुकता भंडाºयाची सोय भाविकांसाठी करतात.

Web Title:  The devotees from the fort rushed to the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.