देवगावी जगदंबा माता मंदिर वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:50 IST2019-06-19T20:50:05+5:302019-06-19T20:50:18+5:30
देवगाव : देवगाव येथील नवसाला पावणारी अशी महती असणारी जगदंबा माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

देवगावी जगदंबा माता मंदिर वर्धापन दिन उत्साहात
देवगाव : देवगाव येथील नवसाला पावणारी अशी महती असणारी जगदंबा माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी गुरू पद्धमाकर जोशी, सचिन जोशी, पुजारी बाळासाहेब गुरव,पुंजाराम गुरव यांनी मंत्राच्या जयघोषात विधीवत पुजा केली. यावेळी संतोष कुलथे,बापु शिंदे, बाबासाहेब बोचरे यांनी सपत्नीक सत्यनारायण पुजा केली.
जगदंबा मातेची मूर्ती पूर्णाकृती असून आपले वाहन मत्ससहित वाघावर विराजमान आहे. तसेच जिद्दीचे व चिकाटीचे प्रतिक असलेले कासवही येथे विराजमान करण्यात आले आहे. देवीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो.
या मातेची अंबाबाई म्हणूनही प्रसिद्धी असल्याने नवरात्र उत्साहात पहाटे पाच पासूनच तर दत्तजयंतीपासून तीन दिवस भरत असलेल्या यात्रेत भाविकांची भरपूर गर्दी असते. भाविक नतमस्तक होऊन नवस करतात. तर काही नवस पूर्ण झाला म्हणून मनोभावे पूजा होम हवन करतात. अशी महती असलेल्या जगदंबा माता मंदिराचा वर्धापनदिन वटसावित्री पौर्णिमेला येतो सकाळपासूनच महिलांनी मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.
याप्रसंगी पर्बत बोचरे, लहानु मेमाणे, दत्तु बोचरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, रघुनाथ साबळे, नामदेव बोचरे, रामनाथ माने, लहानु थोरात, रतन मेमाणे, सोमनाथ मेमाणे, सर्जेराव गायकवाड, मधुकर लोहरकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो १९ जगदंबा माता)