नाशकात डेंग्यूचा कहर, मनपाचे कारवाईचे बळ; रुग्ण हजारावर

By Suyog.joshi | Published: December 14, 2023 11:36 AM2023-12-14T11:36:45+5:302023-12-14T11:37:10+5:30

शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम साइट्सवरही ॲबेट औषध टाकून डेंग्यूच्या डासअळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे

Devastation of dengue in Nashkat, force of municipal action; Over a thousand patients | नाशकात डेंग्यूचा कहर, मनपाचे कारवाईचे बळ; रुग्ण हजारावर

नाशकात डेंग्यूचा कहर, मनपाचे कारवाईचे बळ; रुग्ण हजारावर

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात डेंग्यूने कहर केला असून रुग्णसंख्या हजाराच्या पार पाेहोचली आहे. यामुळे मनपा आरोग्य विभागाकडून विशेष खरबदारी घेण्यात येत असून डेंग्यू उत्पत्ती स्थळ असणाऱ्यांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी नाशिकरोड भागात दोन ठिकाणी, तर नाशिक पश्चिम विभागात तीन ठिकाणी कारवाई करून सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई सतत सुरूच राहणार असल्याची माहिती मनपाचे मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली. शिंगाडा तलाव परिसरात मंगळवारी डास उत्पत्ती ठिकाण आढळल्याने झुलेलाल कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता.

शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम साइट्सवरही ॲबेट औषध टाकून डेंग्यूच्या डासअळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे, घराजवळ कोणतेही पाण्याचे डबके साचू देऊ नये, काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाकडे कळवावी, असे आवाहन मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी सांगितले.  दरम्यान, शहरात ‘झिका’चा पहिला रुग्ण भारतनगर भागात आढळून आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘झिका’चा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असून, गर्भवती महिलेला ‘झिका’ची लागण झाल्यास शिशू मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतींसह जन्माला येते. त्यामुळे ज्या भागात ‘झिका’चा रुग्ण आढळला त्या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील कार्यशाळेत पाठविले जातात. त्यानुसार भारतनगर येथे ‘झिका’चा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदींना गर्भवती महिलांचा शोध घेतल्यानंतर आतापर्यंत १९ गर्भवती महिला आढळल्या. त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही लॅब’कडे पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Devastation of dengue in Nashkat, force of municipal action; Over a thousand patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.