धर्मांधशक्तीचा मुकाबला करण्याचा निर्धार
By Admin | Updated: July 4, 2017 23:38 IST2017-07-04T23:29:48+5:302017-07-04T23:38:22+5:30
मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलची बैठक शमीम फौजी यांच्या उपस्थितीत झाली.

धर्मांधशक्तीचा मुकाबला करण्याचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलची बैठक मनमाड येथे राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. शमीम फौजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. देशातील धर्मांधशक्तींचा मुकाबला करण्याबरोबरच इतर विषयांवर यावेळी गहन चर्चा करण्यात आली.
देशातील व राज्यातील आंदोलनाचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. येत्या काळात पक्ष व संघटना मजबूत करतानाच देशातील उजव्या प्रतिगामी धर्मांधशक्तींचा मुकाबला करण्यासाठी व्यापक एकजुटीची हाक देण्यात आली. तालुका व जिल्हा पातळीवर पुरोगामी शक्तींची एकजूट करून डाव्या संघटनांना बरोबर घेऊन उजव्या प्रतिगामीचा मुकाबला करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कानगो, मनोहर देशकर, सुकुमार दामले, राजू देसले, तुकाराम भस्मे, सुभाष लाडे, नामदेव गावडे आदी उपस्थित होते.