रिक्षांच्या स्टेपनी चोरणाऱ्यास अटक

By Admin | Updated: December 12, 2015 00:13 IST2015-12-12T00:11:28+5:302015-12-12T00:13:16+5:30

रिक्षांच्या स्टेपनी चोरणाऱ्यास अटक

Detainees arrested for stealing ropes | रिक्षांच्या स्टेपनी चोरणाऱ्यास अटक

रिक्षांच्या स्टेपनी चोरणाऱ्यास अटक

नाशिक : घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षांच्या स्टेपनी चोरणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट तीनने रंगेहाथ पकडले आहे़ शहरात आणखी काही ठिकाणी या संशयितांनी चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
चिडे मळ्यातील रहिवासी अजय माधवराव चिडे व मुनीर निजाम शेख यांच्या पाच रिक्षा असून, सोमवारी
(दि़ ३०) रात्री नेहमीप्रमाणे त्या घरासमोर उभ्या केलेल्या होत्या़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीच्या आठ स्टेपनी चोरून नेल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी चिडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
गुन्हे शाखा युनिट तीनचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष गुंजाळ यांना खबऱ्यांकडून मिळालेली माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक एस़ डी़ सानप यांना सांगितली़ तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय मुळक, मोहन देशमुख, गंगाधर केदार, शांताराम महाले, जाकीर शेख, संतोष कोरडे, बाळासाहेब दोंदे, रवि बागुल, ललिता अहेर यांना घेऊन पळसे गावातील फुलेनगर येथे सापळा रचून संशयित दीपक सोपान मुंढे यास अटक केली़ दरम्यान, त्याचा साथीदार संशयित विशाल उर्फ मोगल्या संजय बोरसे हा फरार झाला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Detainees arrested for stealing ropes