बलात्कार प्रकरणी संशयिताला कोठडी

By Admin | Updated: June 4, 2014 00:16 IST2014-06-03T23:45:38+5:302014-06-04T00:16:26+5:30

बलात्कार प्रकरणी संशयिताला कोठडी

Detainee detained in rape case | बलात्कार प्रकरणी संशयिताला कोठडी

बलात्कार प्रकरणी संशयिताला कोठडी

पंचवटी : पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगत असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या तेरावर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणार्‍या संशयिताला न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पेठरोड परिसरात राहणार्‍या तेरावर्षीय बालिकेवर तीन दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर पीडित मुलीने व तिच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील संशयित दुर्गाप्रसाद भालचंद्र सोनकर (२५, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले़ संशयित सोनकर यास पंचवटी पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़

Web Title: Detainee detained in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.