कनाशी वनपरिक्षेत्रात जंगलाचा ऱ्हास

By Admin | Updated: June 13, 2014 00:21 IST2014-06-12T22:17:20+5:302014-06-13T00:21:24+5:30

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Destruction of forest in the Kanasaki Forest Territory | कनाशी वनपरिक्षेत्रात जंगलाचा ऱ्हास

कनाशी वनपरिक्षेत्रात जंगलाचा ऱ्हास

 

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
हातगड परिमंडळातील ठाणापाझ येथील जंगलात साग, पळस , मोह इतर प्रजातींची मोठमोठी झाडे आहेत . परंतु ठाणापाझ परिसरातील जंगल नष्ट होत चालणे आहे . वनपरिमंडळ कार्यालयाच्या दुर्लक्षणामुळे सदरचे जंगल धोक्यात आले आले आहे . येथील जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहेत . त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नवीन झाडांची लागवड झाली पण ती फक्त नावापुरतीच झाली त्यातून फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यात वनविभाग धन्यता मानत आहे.जंगलाचे रक्षण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून मनोराचे बांधकाम केले. परंतु सदर मनोरा फक्त शोभीची वस्तू म्हणून उभे आहे सदर वृक्षांची सर्रास कत्तल सुरू आहे वनविभागाचे कर्मचारी व शासकीय यंत्रणा याकङे दुर्लक्ष करीत असल्याने चोरटे बिनधास्त तोड करत आहेत . पर्यावरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना वृक्षतोड होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जंगलाचे रक्षण करण्यासाठी व जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीसाठी मनोरे आहे. पंरतु तरी सुध्दा झाडाची तोड करण्यात
येते शासनाचे लाखो रूपये
खर्च करून मनोऱ्याचे बांधकाम केले परंतु अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे सदर मनोरे शोभेची वस्तू म्हणून जंगलात उभे आहेत बरेच ठिकाणी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसायासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे . आधिकरी व कर्मचारीवर्ग मूग गिळून बसले आहे त्यामुळे जंगलाचे ऱ्हास होण्यास वाव मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Destruction of forest in the Kanasaki Forest Territory