घोटी : खैरगाव (इगतपुरी) येथील मोराच्या डोंगरावर गावठी दारू हातभट्टीवर घोटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लाख सत्तावीस हजारांचे विषारी रसायन नष्ट केले.ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली खैरगाव येथील घनदाट जंगल परिसरात छुप्या पद्धतीने विषारी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पाच वाजेदरम्यान विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला. आदिवासी दुर्गम परिसर त्यात वीस किलोमीटर परिसर असलेल्या जंगल परिसराची माहिती असलेल्या गोपनीय खबºयांना सोबत घेत मोराच्या डोंगर परिसरातील आघाणवाडी, शिदवाडी, धामणीचीवाडी शिवारात गावठी अड्ड्यावर कारवाई करीत गावठी दारूचे तीन ड्रम, दारू हातभट्टीवरील गुळमिश्रित रसायन २०० लिटरचे ४२ भरलेले प्लॅस्टिक ड्रम नष्ट करण्यात आले. दारू गाळण्यासाठी वापरावयाची साधन सामग्री व बारा मण जळाऊ लाकडे व इतर भट्टीसाठी लागणाºया साहित्य सामग्रीवर अचानक छापा टाकण्यात आला. यामध्ये चार लाख सत्तावीस हजार रु पये किमतीचा माल जप्त करण्यात आला, पैकी गूळमिश्रित रसायनाचे सॅम्पल काढून घेत मिळून आलेले संपूर्ण रसायन व भट्ट्या जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या.
हातभट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:24 IST
खैरगाव (इगतपुरी) येथील मोराच्या डोंगरावर गावठी दारू हातभट्टीवर घोटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लाख सत्तावीस हजारांचे विषारी रसायन नष्ट केले.
हातभट्ट्या उद्ध्वस्त
ठळक मुद्देचार लाखांचा माल जप्त : शेकडो लिटर रसायन नष्ट