नाशिककर असूनही टोलचा भुर्दंड बसणार? पिंपळगाव बसवंत : अन्य जिल्हा नोंदणी वाहनांचा प्रश्न
By Admin | Updated: May 25, 2014 16:36 IST2014-05-25T16:25:45+5:302014-05-25T16:36:09+5:30
नाशिक : जिल्ातील नाशिक आणि मालेगाव येथे नोंदणी झालेल्या (म्हणजेच एमएच १५ व एमएच ४१) मोटारींना पिंपळगाव बसवंत येथे सध्याच्याच दराने टोल आकारण्यात येणार आहेत. अन्य जिल्ांतील नोंदणी असलेल्या मोटारींना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. नाशिक जिल्ात अनेक अन्य जिल्हा नोंदणी असलेल्या किंवा सेकंड हॅँड मोटारी आहेत, त्यांना मात्र नाशिककर असूनदेखील या निर्णयाचा फटका बसणार आहे.

नाशिककर असूनही टोलचा भुर्दंड बसणार? पिंपळगाव बसवंत : अन्य जिल्हा नोंदणी वाहनांचा प्रश्न
नाशिक : जिल्ातील नाशिक आणि मालेगाव येथे नोंदणी झालेल्या (म्हणजेच एमएच १५ व एमएच ४१) मोटारींना पिंपळगाव बसवंत येथे सध्याच्याच दराने टोल आकारण्यात येणार आहेत. अन्य जिल्ांतील नोंदणी असलेल्या मोटारींना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. नाशिक जिल्ात अनेक अन्य जिल्हा नोंदणी असलेल्या किंवा सेकंड हॅँड मोटारी आहेत, त्यांना मात्र नाशिककर असूनदेखील या निर्णयाचा फटका बसणार आहे.
पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावरील दर काही दिवसांपूर्वी वाढविण्याचा निर्णय झाला. परंतु निफाडमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यामुळे जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार नाशिक जिल्ातील नागरिकांना टोलवाढीचा भुर्दंड सोेसावा लागू नये यासाठी नाशिक (एमएच १५) आणि मालेगाव (एमएच ४१) अशा प्रकारे मोटारीवर क्रमांक असल्यास सध्या लागू असलेला करच भरावा लागेल. अन्य जिल्ांतील नोंदणी असलेल्या कोणत्याही वाहनाला मात्र सध्याच्या तिप्पट टोल भरावा लागणार आहे. अर्थात, यामुळे जिल्ातीलच अन्य अनेक वाहनधारकांना फटका बसणार आहे.
अनेक नागरिक मुंबई किंवा पुणे येथून मोटारी खरेदी करतात. त्यात सेकंड हॅँड मोटारींचादेखील समावेश आहे. त्यामुळे मंुबई आणि पुण्याच्या मोटारी खरेदी करणार्या आणि अन्य जिल्ांतून नाशिकमध्ये आपल्या मोटारीसहीत स्थलांतरीत झालेल्या नाशिककरांना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. कारण मुंबईतील मोटारींवर एमएच ०१ पासून तसेच पुण्यातून खरेदी केलेल्या मोटारींवर एमएच १२ व १४ अशी नोंद असलेल्यास अन्य जिल्ांतील वाहन म्हणून त्यांच्याकडून तिप्पट टोल आकारला जाईल. अनेक नागरिक आणि व्यावसायिक ज्या राज्यात वाहनांवर कर कमी आहे, त्याठिकाणाहून मोटारी खरेदी करतात. गुजरातमधून खरेदी झालेल्या मोटारींची संख्या नाशिकमध्ये प्रचंड आहे. अशा नागरिकांनादेखील तिप्पट टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे खास नाशिककरांसाठी घेतला गेलेला निर्णयदेखील अनेक नागरिकांना अडचणीचा ठरणार आहे.
...इन्फो...
...असाही पर्याय असू शकतो
अन्य जिल्ांत किंवा राज्यांत नोंदणी झालेली जी वाहने नाशिक जिल्ातील नागरिक वापरत असतील तर त्यांच्या आरसी बुकवर नाशिकचा रहिवासी पत्ता बघून टोलमधून सूट देता येणे शक्य आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर केला जाणे अपेक्षित असून, तसे जिल्हा प्रशासनाने संबंधिताना सूचित करणे आवश्यक आहे.