पंतप्रधानांचे बंधू असूनही साधे राहणाऱ्या पंकज मोदींना भावले भक्तिधाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:08+5:302021-09-19T04:16:08+5:30
पंतप्रधान म्हटले अति महत्त्वाची व्यक्ती आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा व्यवस्था. मागे पुढे असणारे नेते कार्यकर्ते हे सर्वच ओघाने ...

पंतप्रधानांचे बंधू असूनही साधे राहणाऱ्या पंकज मोदींना भावले भक्तिधाम
पंतप्रधान म्हटले अति महत्त्वाची व्यक्ती आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा व्यवस्था. मागे पुढे असणारे नेते कार्यकर्ते हे सर्वच ओघाने येते, परंतु त्यांच्या कुटुंबीयदेखील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे त्यांचे कुटुंबीय असतात. परंतु मोदी यांचे बंधू पंकज मोदी याला अपवाद तर आहेच, परंतु सतत धार्मिक कार्यात मग्न असणारे पंकज मोदी हे याच साधेपणामुळे परिचित आहेत. नाशिकमध्ये कैलास मठात गेल्या महिन्यात दोन वेळा त्यांनी हजेरी लावल्याने थेट पंतप्रधानांचे लहान बंधू नाशिकमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या असल्या तरी त्यांनी मात्र तसे भासवलेही ! मुळात नाशिकमध्ये त्यांनी येण्याचे निमित्त ठरले ते कैलास मठाचे अध्वर्यू असलेले स्वामी संविदानंद सरस्वती ! नाशिकच्या कैलास मठाची सूत्रे गेली सुमारे २५ वर्षे सांभाळणारे स्वामी संविदानंद हे दरवर्षी केदारनाथ-अमरनाथ या ठिकाणी नित्यनेमाने जातात. दोन वर्षांपूर्वी ते केदारनाथ येथे मंदिरात दर्शन घेत असतानाच त्याठिकाणी स्वामीजी आणि पंकज भेट झाली आणि आध्यात्मिक अनुबंध तयार झाला. दोन दिवस तेथेच भक्तनिवासात राहणाऱ्या पंकज मोदी यांच्याशी चांगला परिचय झाल्यानंतर त्यांचे ऋणानुबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून कोठेही मंदिर मठात दर्शनासाठी गेल्यानंतर दोघेही तेथील छायाचित्रांची देवाणघेवाण ते करत असतात. त्यातून स्वामी संविदानंदजी यांनी त्यांना निमंत्रण दिले आणि मग गेल्या महिन्यात दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगार्चन सोहळ्यास हजेरी लावली. साधारण साधकांप्रमाणेत त्यांनी पूजा केलीच शिवाय मठातील साधारण खोलीत त्यांनी मुक्कामही केला.
नाशिकच्या कैलास मठाचे स्वामी संविदानंदजी यांचाही लोकसंग्रह चांगला असून, त्यांनाही पंकज मोदी यांचा साधेपणा अधिकच भावला. पंतप्रधान किंवा कोणताही राजकीय संदर्भाशिवाय पंकज मोदी यांचे बोलणे असते. मनात आणले तर एखाद्या मोठ्या कंपनीत मोठे पद सहज भुषवू शकतात. मात्र ते न करता ते सहज साधेपणाने वागतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
इन्फेा...
नाशिकमधील पूजा हा अविस्मरणीय क्षण..
नाशिकशी माझा तसा थेट संबंध नाही मी नाशिकशी अपरिचित होतो. मात्र, कैलास मठाचे प्रमुख स्वामींजीमुळे माझा येथे संबंध आला. येथील पूजा हा एक सुखद अविस्मरणीय क्षण असल्याच्या भावना पंकज मोदी यांनी नाशिकमध्ये कैलास मठातील पूर्णाहुती सोहळ्यात व्यक्त केल्या. नाशिकमध्ये येण्यासाठी स्वामीजी माझ्यासाठी माध्यम बनले. दोन वर्षांपूर्वी त्यांची केदारनाथ येथे कपाट बंद करण्याच्या वेळी भेट झाली आणि त्याचवेळी आमचे अनुबंध जुळल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो..
कैलास मठातील शिवलिंगार्चन पूजा ही गेल्या २५ वर्षांपासून निरंतरपणे सुरू आहे. शिवसहस्त्रनाम घेऊन फळ आणि अन्य खाद्यपदार्थ अर्पण केले जातात. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि रुग्णालयात गोरगरिबांना ही फळे दिली जातात, त्यामुळे या पूजेला सामाजिक आशयदेखील असल्याचे स्वामी संविदानंद सरस्वती यांनी सांगितले.