शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

रितेश देशमुखसोबत अभिनयाची इच्छा महागात

By admin | Published: June 20, 2017 10:33 PM

साडेनऊ लाखांचा गंडा; तोतया दिग्दर्शक पती-पत्नीविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : बॉलिवुडमधील सिनेअभिनेता रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलीची तब्बल साडेनऊ लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या तोतया चित्रपट दिग्दर्शकासह त्याच्या पत्नीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हर्षद ऊर्फ हॅरी आनंद सपकाळ (२१, पाथर्डी फाटा) असे या तोतया चित्रपट दिग्दर्शकांचे नाव असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, नाशिक शहरच नव्हे तर राज्यभरातील अनेक तरुणींची सपकाळने आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ पाथर्डी फाटा येथे आलिशान व महागडा फ्लॅट भाडेतत्त्वावर राहणारा तोतया दिग्दर्शक हर्षद सपकाळ हा सोशल मीडियावरील व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक याद्वारे बॉलिवूडमधील सिने अभिनेता रितेश देशमुखसह अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री तसेच दिग्दर्शकांसोबत ओळख असून, चित्रपटात काम मिळवून देतो अशी मार्केटिंग करीत असे़ केवळ चित्रपटच नव्हे तर मॉडेलिंग क्षेत्रातही संधी देण्याचे आमिष त्याने दाखविले होते़ सोशल मीडियावरील ही जाहिरात शहरातील हॉटेल व्यावसायिक शरद पाटील यांच्या मुलीपर्यंत पोहोचली़ पाटील यांच्या मुलीला अभिनयात रुची असल्याने ती वडिलांना संशयित हर्षदबाबत माहिती दिली़ हर्षदने पाटील यांच्याशी ओळख वाढवत परदेशात फिल्मचे शुटिंग सुरू असल्याची थाप मारली़ तसेच मुलीला रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून डिसेंबर २०१६ पासून त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख २८ हजार रुपये उकळले़ यानंतर मुलीच्या कामाबाबत विचारणा करताच तो टाळाटाळ तसेच मोबाइल बंद ठेवू लागला़ यादरम्यान पाटील यांनी अधिक चौकशी करताच त्याने आतापर्यंत सुमारे दहा ते बारा जणांना प्रत्येकी पाच ते वीस लाखांपर्यंत फसवणूक केल्याचे समोर आले़ पाटील पोलिसांकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्षद फरार झाला होता़ मात्र पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासमवेत तसेच पोलिसांच्या मदतीने मुंबई, गोवा, पुणे या ठिकाणी त्याचा शोध घेत होते़ पुण्यातील कोथरूड येथे एका मित्राच्या घरात लपलेल्या हर्षदची माहिती मिळताच पाटील व त्यांच्या नातेवाइकांनी त्याच्यावर नजर ठेवली़ मंगळवारी (दि़२०) हर्षद पुण्याहून नाशिकला खासगी बसने निघाला असता पाळतीवर असलेल्या त्यांच्या नातेवाइकाने त्याच्यासमवेत प्रवास करून दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो द्वारकेला उतरला असता त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून हर्षद व त्याची पत्नी अश्विनी सपकाळ विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.