शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी आयटककडून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:24 IST

आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

ठळक मुद्देआशा गटप्रवर्तकांचा प्रलंबीत मागण्यांसाठी मोर्चाग्रामरोजगार सेवकांचाही मोर्चाक सहभागकर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये वेतन देण्याची मागणी

नाशिक : आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. 17) आयटकच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.आयटकच्या माध्यमातून आशा व गटप्रवर्तक, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटना यांनी एकत्रितरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले. या निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी संघटनांनी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आयटकशी संलग्न असलेल्या या संघटनांनी बुधवारी देशव्यापी आंदोलन करीत त्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, मनरेगा, एकात्मिक बालविकास योजना, पोषण आहार आदी विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सर्व कर्मचा:यांना किमान वेतन 18 हजार रु पये मिळावे, सामाजिक सुरक्षा लागू करावी, आशा व आशा गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करत असून, ते मानधनही शासनस्तरावरून वेळेत दिले जात नाही. तसेच शासकीय जिल्हा रु ग्णालय, नाशिक ग्रामीण रु ग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कर्मचा:यांना सन्मानाची वागणूक मिळावी, अंशकालीन स्त्री परिचरांना किमान सहा हजार रु पये मानधन त्वरित लागू करावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायम राबविण्याचे जाहीर करावे, आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ द्यावा तसेच आशा व आशा गटप्रवर्तक महिला कर्मचा:यांची शासनाच्या आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर नेमणुका कराव्यात (त्यासाठी त्यांची परीक्षा, प्रशिक्षण व मुलाखतीसंबंधी आदेश करावेत), अशी मगणी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, सुवर्णा मेतकर, विजय दराडे, माया घोलप, सुमन बागुल, मनीषा खैरनार, अर्चना गडाख, छाया खैरनार, दीपाली कदम, रूपाली सानप, सुरेखा खैरनार आदींनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य