शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या प्रयोगांचे चित्रण करा :  मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:28 IST

शेतकयांनी सुखी समृद्ध होण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता काम केल्यास त्याला यश मिळू शकते असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

तळवाडे दुंधे : शेतकºयांनी सुखी समृद्ध होण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता काम केल्यास त्याला यश मिळू शकते असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.  मालेगाव तालुक्यातील तळवाडे दुंधे येथे कृषीरत्न फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत खते व बियाणे वाटप कार्यक्रमात अनासपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव, अजिंक्य भुसे, संजय हिरे, नवल मोरे, कृष्णा बावीस्कर, प्रफुल अहिरे उपस्थित होते. यावेळी अनासपुरे म्हणाले, तरुणांनी उटसुट सेल्फी व फेसबुकमध्ये गुंतुन न राहता शेतकºयांच्या व्यथांचे चित्रण करावे, शेतकºयांनी शेतात केलेले नवनवीन प्रयोग याचे चित्रण करुन समाजापुढे मांडावे.  यावेळी रामेश्वर ता. देवळा येथील जिजाबाई पोपट पवार, कळवणचे बळवंत बापुराव पाटील, सटाण्याचे उज्ज्वला शिवाजी देवरे, किकवारी ता. सटाणा येथील त्र्यंबक दावल काकुळते, पिळकोस ता. कळवण येथील ज्योती प्रवीण जाधव, आघार ता. मालेगाव येथील राजेंद्र त्र्यंबक हिरे, दाभाडी येथील भावना निळकंठ निकम, वडेल येथील नयन लोटन सोनवणे, तिसगाव ता. देवळा येथील तुळशीराम कान्हु जाधव यांना कृषीरत्न आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते करण्यात आले.  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, देशाच्या सिमेवर लढताना शहीद झालेल्या जवानाचे कुटुंब, अपंग, निराधार व आर्थिक दुर्बल घटकातील १०१ शेतकरी कुटुंबांना कृषीरत्न फाऊंडेशनतर्फे मोफत खते व बियाणांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक कृषीरत्न फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार यांनी केले. सूत्रसंचलन शिवदास निकम व सागर रौंदळ यांनी तर आभार प्रदर्शन बादलसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास अमोल देशमुख आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे