शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

वडाळीभोईनजीक अपघातात पोलीस उपअधीक्षक ससाणे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:14 IST

पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते.

ठळक मुद्देवाहनाचा वेग अधिक असल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चांदवड तालुक्यातील वडाळीभोईनजीक झालेल्या कार अपघातात अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. नाशिक येथील आपल्या घरी त्यांच्या चारचाकी वाहनाने परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळून काळाने ससाणे यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिकरोडला शोककळा पसरली.

पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते. अचानक त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली. वाहनाचा वेग अधिक असल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. त्यात ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात स्थळावरून ओळखीच्या व्यक्तीकडून याबाबतची माहिती माने गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह यांना समजताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. ससाणे यांच्या अपघाती मृत्युमुळे जळगाव ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस उपअधीक्षक ससाणे हे नाशिकरोडच्या गायखे कॉलनीतील साई आनंद सोसायटीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी असा परिवार आहे. पोलीस खात्यात अत्यंत सालस स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक