वंचित आघाडी स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:40+5:302021-02-05T05:40:40+5:30
लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग न घेता भरमसाट दिलेली वीज बिले व सुरू असलेली सक्तीची वसुली, वीज बिल माफीचे मंत्र्यांनी ...

वंचित आघाडी स्वबळावर लढणार
लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग न घेता भरमसाट दिलेली वीज बिले व सुरू असलेली सक्तीची वसुली, वीज बिल माफीचे मंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळणे, नाशिकमध्ये वाढलेली गुन्हेगारी, विद्यार्थी जात पडताळणीतील दिरंगाई, नाशिक महापालिका तसेच शिवभोजन थाळी योजनेतील कथित भ्रष्टाचार आदी प्रश्नी आगामी काळात पक्ष तीव्र आंदोलन करणार आहे. पुढील २५ वर्षांतील आव्हाने, संधी लक्षात घेऊन पक्ष व युवा आघाडी बांधणीचे काम सुरू झाले आहे. युवकांनी पक्ष निरीक्षक किंवा ऑनलाइन नोंदणी करून सभासद व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, शमीभा पाटील, ऊर्मिला गायकवाड, चेतन गांगुर्डे, जीतरत्न पटाईत, अक्षय बनसोडे आदी उपस्थित होते.