वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:51 IST2016-04-18T22:48:56+5:302016-04-18T22:51:20+5:30

वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

The departure of Vavi to the fort | वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

 वावी : चैत्र पौर्णिमेला श्री सप्तशृंगगडावर भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून सुमारे १५० भाविक पायी दिंडीद्वारे रवाना झाले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून वावी ते सप्तशृंगगड पायी दिंंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिंडी सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. यात्रोत्सवासाठी सोमवारी दुपारी भाविक पायी दिंडीने रवाना झाले. मिठसागरे, पंचाळे, वडांगळी, हिवरगाव, म्हाळसाकोरे, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, पालखेड, वडनेरभैरव, बहादुरी, माहुडी, वणी यामार्गे जाणाऱ्या या दिंडीतील यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी चहा, थंड पेय, अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पदयात्रेसाठी आकर्षक रथ सजविण्यात आला असून, दिंडीसोबत टेम्पो, पाण्याचा टॅँकर असणार आहे. रविवारी सायंकाळी प.पू. रामप्रभूजी महाराज यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी दुपारी दिंडीचे श्री सप्तशृंगगडाकडे प्रस्थान झाले.
पदयात्रेचे नियोजन श्री सप्तशृंगीमाता पदयात्रा सेवा मंडळ व जय बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)वावी येथून श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाकडे निघालेल्या पदयात्रेसाठी सजविण्यात आलेला आकर्षक रथ.

Web Title: The departure of Vavi to the fort