शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:10 PM

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.

ठळक मुद्देपंढरपूरकडे मार्गस्थ : हजारो वारकरी सहभागी; ४५० किमीचा प्रवास

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली.संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरी दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी निवृत्तिनाथांच्या पादुका मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पूजा, आरती, अभंग आदी विधी पार पाडल्यानंतर वारकऱ्यांनी संत निवृत्तिनाथांचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत निवृत्तिनाथ महाराज की जय असा जयजयकार करत रथ हलला. पालखी रथाला सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला मान मिळाला, तर रथाचे सारथ्य बाळासाहेब अडसरे व अजय अडसरे हे बंधू करत आहेत. पायी दिंडीने प्रवास करणे हे केवळ मौज मजा करून प्रवास नव्हे, तर ती एक साधना आहे. अशी धारणा असल्याने या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. सकाळी कुशावर्ताजवळ रथ आल्यानंतर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन कुशावर्त तीर्थावर सपत्नीक पूजा केली. यावेळी सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे उपस्थित होते. तेथून भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पालखी नाशिककडे मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकºयांच्या नातेवाइकांशी भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. हा दिंडी सोहळा २४ दिवसांच्या पायी प्रवासाचा राहणार असून, सुमारे ४५० किमी अंतर कापणार आहे. भावभक्तिमय वातावरणात निघालेल्या या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार असून, निर्मळ वारी उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश दिला जाणार आहे.आज नाशिकला आगमनदुपारी १२.३० वाजता पालखीने त्र्यंबकेश्वर सोडले. मंगळवारी पालखीचा पहिला मुक्काम नाशिक येथे सातपूरला पडणार आहे. २० जूनला पालखीचा पळसे येथे मुक्काम होईल. पंढरपूर वारी १२ जुलै रोजी असल्याने १२ ते १५ जुलैदरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे त्र्यंबकेश्वर फडावर राहील. २४ दिवसांचा प्रवास केल्यानंतर वारी करून पालखीचा परतीचा प्रवास १६ जुलैपासून सुरू होईल. सतराव्या दिवशी पालखी त्र्यंबकेश्वरला येईल. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम