शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भगूर शाळेत विभागीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:17 PM

शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते झाले.

भगूर : शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते झाले.  याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान व गणित याविषयी गोडी निर्माण होणे काळाची गरज आहे. त्यामुळे विज्ञान व गणित क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा थोर आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी नासाला भेट दिल्याप्रसंगीचे अनुभव कथन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शीतलदास बालाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ शेटे, नारायणदास चावला, तानाजी करंजकर, रतन चावला, भगवान देशमुख, प्रसाद आडके, शशिकांत वैद्य, चंद्रशेखर कोरडे, रा.मु. आंबेकर, जितेंद्र भावसार उपस्थित होते.  प्रास्ताविक मधुसुदन गायकवाड यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक लता जोशी, रामदास जाधव, प्रवीण रोकडे, कैलास वाघ, कृष्णा लोखंडे, अनिल कवडे, सुनील कापसे,  अशोक बोराडे, संदीप गायकवाड, ललित भदे, विलास म्हसाळ, कैलास गायकवाड, वैशाली गायकवाड, भारती चौधरी, सारिका भावसार, वैशाली मुठाळ आदिंसह सर्व  शाळांचे विज्ञानशिक्षक उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील ६० शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पहिली ते चौथीच्या हसत खेळत गटाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त साहित्याची निर्मिती, पाचवी ते आठवीच्या जलसंवर्धन गटातील विद्यार्थ्यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी विषयांवर प्रयोग सादर केले.  भविष्यातील ऊर्जास्रोत, शेती तंत्रज्ञान, पाणी शुद्धीकरण, दळणवळण, पर्यावरण संरक्षण, कार्बन डायोक्साईड समस्या व उपाय आदी एकूण १५० विज्ञान प्रकल्प तसेच गणित मेळाव्यात गणितातील गमती-जमती, गणितातील उपकरणे या विषयांवर ४५ प्रकल्प सादर करण्यात आले.

टॅग्स :Schoolशाळाscienceविज्ञान