शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन‌् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 20:03 IST

नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.

ठळक मुद्देगुरुवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रोपांचा पुरवठा निसर्ग संवर्धनाचा शिवरायांचा वसा पुढे नेण्यासाठी हा उपक्रम

नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यावर शिवप्रेमी युवक मित्र मंडळांनी महाराजांच्या आजुबाजुंच्या गड-किल्ल्यांवर वृक्षलागवड करुन त्यांचे संवर्धन पार पाडून पर्यावरणपुरक आगळ्यावेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन सामाजिक वनीकर विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.शिवरायांचे गडांवर पुर्वीप्रमाणे वृक्षराजी बहरावी आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाने आगामी शिवजयंतीच्या औचित्यावर निसर्गसंवर्धनाकरिता शिवप्रेमींना वृक्षलागवड व संवर्धन करण्याची साद घातली आहे. ह्यवृक्षरुपी हिरवी मशाल गडावर लावूया, लाडक्या राजाचा गड हरित वृक्षांनी सजवुयाह्ण असा अनोखा उपक्रम सामाजिक वनीकरणाने हाती घेतला आहे. नोंदणीकृत मंडळ तसेच इतर सामाजिक संस्थांनी आपले मागणीपत्र पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सामाजिक वनीकरण विभागाच्या गंगापुररोड येथील गंगाकाठ शासकिय रोपवाटिकेत प्रत्यक्षपणे जमा करावीत. प्रत्येक मंडळाला किमान वीस रोपे मोफत पुरविली जाणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. गुरुवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रोपांचा पुरवठा सुरु राहणार आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी होणार आहे. शिवप्रेमींकडून विधायक उपक्रमावर भर दिला जाणार आहे. हे लक्षात घेत निसर्ग संवर्धनाचा छत्रपती शिवरायांचा वसा पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकforest departmentवनविभागNatureनिसर्गenvironmentपर्यावरणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज