नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज
By Admin | Updated: June 14, 2017 00:19 IST2017-06-14T00:19:05+5:302017-06-14T00:19:47+5:30
पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज
पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तकेलोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : १५ जून अर्थातच नवीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आरंभ, तर शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस. हा दिवस आनंददायी आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जोरदार तयारी केली आहे.
गुरुवारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गावातून निघणाऱ्या प्रवेश दिंडी सोहळ्याने व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.मोफत शिक्षणाचा अधिकार या कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे, एकही विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी गृहभेटी आणि पालक जनजागृती करून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांद्वारे झाले पाहिजे यासाठी निफाड तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांवर तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकारी शाळाभेटी देणार आहेत. शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशी मुलांना गोड पदार्थ देण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यासाठी शिक्षक तीन दिवसांपासून शाळेत जाऊन तयारी करत आहेत. शालेय
आवार, वर्गखोली, कार्यालय यांची साफसफाई करून वर्गाच्या पुढे तोरणे, पताका लावून सजावट करण्यात आली आहे. एकंदरीतच शाळेच्या पहिल्या दिवसाची जोरदार तयारी शिक्षण विभागाने केली आहे.