कृषी दिनाबाबत विभागच अनभिज्ञ; कृषी संचालकांची नाराजी आत्मा व जिल्हा परिषदेला दिले स्मरणपत्र

By Admin | Updated: June 28, 2014 01:48 IST2014-06-28T01:40:26+5:302014-06-28T01:48:55+5:30

कृषी दिनाबाबत विभागच अनभिज्ञ; कृषी संचालकांची नाराजी आत्मा व जिल्हा परिषदेला दिले स्मरणपत्र

Department of Agricultural Affairs unaware; Reminders given to the angry leaders of the Director of Agriculture and the Zilla Parishad | कृषी दिनाबाबत विभागच अनभिज्ञ; कृषी संचालकांची नाराजी आत्मा व जिल्हा परिषदेला दिले स्मरणपत्र

कृषी दिनाबाबत विभागच अनभिज्ञ; कृषी संचालकांची नाराजी आत्मा व जिल्हा परिषदेला दिले स्मरणपत्र

  नाशिक : १ जुलै हा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असून, त्या दिवशी राज्यात सर्वत्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी यासंदर्भात काय नियोजन केलेले आहे, याची माहिती मागवूनही ती वेळेत न दिल्याने विभागीय कृषी सहसंचालकांनी आत्मा व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. १ जुलै रोजी वसंतराव नाईक जयंतीनिमित्त जिल्'ात कृषी दिन साजरा करण्यात यावा व तो कशाप्रकारे साजरा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती राज्याच्या कृषी विभागाने २५ जूनपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा संचालक, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना विचारली होती. ही माहिती ई-मेलद्वारे व फॅक्सद्वारे तत्काळ दिली तरी चालण्यासारखे होते. मात्र ती २५ जून सोडाच २७ जून उजाडले तरी प्राप्त न झाल्याने विभागीय कृषी संचालकांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त करीत तत्काळ माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Department of Agricultural Affairs unaware; Reminders given to the angry leaders of the Director of Agriculture and the Zilla Parishad