देवळालीत आठवडे बाजार मैदानावरील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:59 IST2018-01-13T00:57:04+5:302018-01-13T00:59:10+5:30
देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रविवार आठवडे बाजार मैदानावरील चार गोठ्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले.

देवळालीत आठवडे बाजार मैदानावरील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त
देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रविवार आठवडे बाजार मैदानावरील पोलीस बंदोबस्तात चार गोठ्यांचे अनेक वर्षांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले. देवळाली छावणी परिषदेने रविवार आठवडे बाजार भरणाºया जागेवर गोठ्याचे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र याबाबत संबंधित गोठेमालकांना न्यायालयात धाव घेतल्याने अतिक्रमण काढण्यास तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर छावणी परिषदेने अतिक्रमण काढण्याबाबत न्यायालयाकडे परवानगी मागितल्याने गोठेमालकांनी जिल्हा व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. प्रारंभी अतिक्रमणधारकांकडून विरोध करण्यात आला. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात दोन जेसीबीच्या साह्याने चारही गोठ्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे रविवार आठवडे बाजारास जादा जागा उपलब्ध होणार आहे.