गर्दीने फुलले रस्ते

By Admin | Updated: April 19, 2016 00:30 IST2016-04-18T23:31:01+5:302016-04-19T00:30:05+5:30

सप्तशृंगी : दर्शनास जाणाऱ्यांसाठी सुविधा

Densely populated roads | गर्दीने फुलले रस्ते

गर्दीने फुलले रस्ते

लोहोणेर : आदिमाया आदिशक्ती खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांनी कसमादेच्या भागातील रस्ते फुलून गेले आहेत. उन्हाची पर्वा न करता हे भाविक देवीच्या ओढीने मार्ग पादाक्र ांत करीत आहेत.
दूरवरून आलेल्या भाविकांची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून ठिकठिकाणी अन्नछत्रे, शीतपानगृहे, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठेंगोडा येथे यशवंत पाटील याच्या मळ्यात, तर श्री स्वामी समर्थ आॅइल मिल येथे राजेंद्र अलई याच्या वतीने अन्नदान, भावसार गल्लीत अल्पोपाहारची व्यवस्था करण्यात आली आहे. लोहोणेर येथे मेघराज परदेशी मित्रमंडळाच्या वतीने अन्नछत्र चालविण्यात येत आहे. वसाका कार्यस्थळावर नव्याने अन्नछत्र सुरू करण्यात आले, तर दिलीप नेरकर यांच्या वतीने चिवड्याचे वाटप करण्यात येत असून, लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी स्वतंत्र आरोग्यसेवा छत्र सुरू करण्यात आले आहे.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार, डॉ. मंदाकिनी दाणी, डी. पी. पवार, व्ही. एच. परदेशी, सुरेश पाटील, सोनाली पाटील, जे. एम. सोनवणे, तनुजा बोरसे, सतीश आहेरराव, दिलीप निकम, किशोर सोनवणे, श्रीमती मोहन, श्रीमती शेवाळे, संजय कुराडे आदि भाविकांची सेवा करीत
आहेत. कडक उन्हामुळे दुपारऐवजी सायंकाळी हे भाविक मार्ग पादाक्रांत करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Densely populated roads