शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दाट धुक्यामुळे कसारा घाटात ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 7:21 PM

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात नवीन व जुन्या घाटात रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असुन, त्यातच रोडच्या दोन्ही लेनच्यामध्ये सफेद पट्या आखलेल्या नाहीत. त्यामुळे या घाटातील दोन्हीही रोडवर अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : मागील अपघाताची पुनरावत्ती; सफेद पट्या नसल्याने अपघात

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात नवीन व जुन्या घाटात रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असुन, त्यातच रोडच्या दोन्ही लेनच्यामध्ये सफेद पट्या आखलेल्या नाहीत. त्यामुळे या घाटातील दोन्हीही रोडवर अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.महिन्याभरापुर्वीच बिबळवाडी शिवारात एक भंगाराने भरलेला ट्रक पलटी होऊन त्यात ट्रक चालक जागीच गतप्राण झाला होता. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती बुधवारी पहाटे घडली आहे.मुंबई येथून नाशिकच्या दिशेने जुन्या कसारा घाटातून मध्य प्रदेश मधील लोखंडी पत्रे भरलेला ट्रक (एमपी.०९ एच एच१६२१) घाटातील फॉग सिटी जवळून चालला होता. ट्रक चालकाला दाट धुके असल्याने तसेच रोडच्या मधोमध सफेद पट्याच नसल्याने रोडचा अंदाज न आल्यामुळे तो थेट नाशिक दिशेच्या विरु ध्द मुंबई दिशेने जाणाऱ्या नविन घाटातील मुंबईच्या दिशेने जाणाºया रोडवर पलटी झाला. यामुळे या लेनवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहतूकीवर परिणाम झालेला दिसला. परंतु सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसून ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या ठिकाणी एकाच जागेवर दोनदा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने येथे अपघात स्थळ होवू नये याची काळजी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. दरम्यान या अपघाताचा तपास कसारा पोलिस व घोटी (टॅप) चे ट्रॅफिक पोलीस करीत आहेत.( फोटो )कसारा घाटात पलटी झालेला ट्रक.(फोटो १७ कसारा, १७ कसारा१)