सोयगावात आढळला डेंग्यूचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 01:04 IST2021-09-18T01:03:53+5:302021-09-18T01:04:46+5:30

मालेगाव शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. सदर रुग्णास ताप येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी केली असता तो डेंग्यूबाधित असल्याचे आढळून आले.

Dengue patient found in Soyagaon | सोयगावात आढळला डेंग्यूचा रुग्ण

सोयगावात आढळला डेंग्यूचा रुग्ण

सोयगाव : मालेगाव शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. सदर रुग्णास ताप येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी केली असता तो डेंग्यूबाधित असल्याचे आढळून आले. पुढील उपचारासाठी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या पाऊसपाणी जागोजागी साचून असल्याने साथीच्या रोगांबरोबरच डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. जंतनाशक फवारणी दर आठवड्यात होणे गरजेचे असताना आता ह्या आठवड्यात फवारणी चालू केली असली तरी साथीच्या रोगांचा चांगल्यापैकी फैलाव झाला आहे. महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

Web Title: Dengue patient found in Soyagaon