डेंग्यूची रुग्णसंख्या प्रथमच हजारावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:26 AM2019-12-18T01:26:44+5:302019-12-18T01:27:51+5:30

महानगराला डेंग्यूने विळखा घातला असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३२३ डेंग्यूबाधीत रुग्ण आढळल्यानंतर डिसेंबर महिना अर्धा संपुष्टात आला असताना त्यात अजून १५४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच्या डेंग्यूबाधीतांच्या संख्येने यंदाच्या वर्षभरात तब्बल हजाराचा टप्पा ओलांडून १,०२५ रुग्णांपर्यंत पोहोचला आहे.

Dengue outbreak hits thousands for the first time! | डेंग्यूची रुग्णसंख्या प्रथमच हजारावर !

डेंग्यूची रुग्णसंख्या प्रथमच हजारावर !

Next
ठळक मुद्देडिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत नवीन १५४ बाधीत रुग्णांची नोंद

नाशिक : महानगराला डेंग्यूने विळखा घातला असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३२३ डेंग्यूबाधीत रुग्ण आढळल्यानंतर डिसेंबर महिना अर्धा संपुष्टात आला असताना त्यात अजून १५४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच्या डेंग्यूबाधीतांच्या संख्येने यंदाच्या वर्षभरात तब्बल हजाराचा टप्पा ओलांडून १,०२५ रुग्णांपर्यंत पोहोचला आहे.
नाशिकमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका तसेच अन्य शासकीय यंत्रणा केवळ बैठका घेऊन आणि दोषींवर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगत हात झटकत आहे. नाशिक महापालिकेने आतापर्यंत १०९ दोषींवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, डेंग्यूसारख्या आजाराबाबत यापेक्षा अधिक ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने वाढत्या आजारांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूबाधीतांची वर्षभरातील रुग्णसंख्या यंदा हजारावर पोहोचल्याने हा आकडा नाशिकच्या आरोग्य समस्येबाबत चिंतेत भर घालणारा ठरला आहे. गत वर्षापर्यंत नाशिकला डेंग्यू तपासणी करणारी नियमित लॅबच नाशिकला नव्हती.
केवळ दोनच मृत्यूची नोंद
महानगरात वर्षाच्या प्रारंभापासून आतापर्यंत तब्बल चार हजारांवर डेंग्यूबाधीत संशयित रुग्ण असल्याचे आढळले होते. त्यातील १०२५ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या यंत्रणेने मात्र डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रु ग्णांची नोंद केवळ दोनच असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा प्रकार बाधीतांचे मृत्यू नजरेआड करण्यात आल्याप्रमाणे असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Dengue outbreak hits thousands for the first time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.