शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आठवडाभरात डेेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:30 IST

शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे दिसत नाही. आठवडाभरात शहरात डेंग्यूचे २४, तर स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रोगराई कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईचे थैमान सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत स्वाइन फ्लूमुळे सहा जणांचा बळी गेला, तर एकूण बळींची संख्या ५७ वर गेली. डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या महापालिकेत फक्त प्रशासनच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करते असे भासवले जात असले तरी रोगराई थांबवतांना तसे दिसत नाही. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने नगरसेवक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत त्यावरून प्रशासनावर रोष व्यक्त झाला. इतकेच नव्हे आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापौर रंजना भानसी यांनी चांगलेच सुनावले आणि रोगराईस जबाबदार ठरवत कृती न केल्यास कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, यानंतरदेखील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. महापालिकेच्याच आकडेवारीनुसार १५ ते २२ आॅक्टोबर दरम्यान २४ डेंग्यूचे, तर २६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर एक महिन्याचा विचार केला तर महिनाभरात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत ६३० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे आॅक्टोबर महिन्याच्या २२ दिवसांतच ७१ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत २२६ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत डेंग्यूचा एक रुग्ण दगावला आहे. मात्र घरटी रुग्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमुळे अजूनही अनेक रुग्णालये हाउस फुल आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमधील गर्दी कमी झालेली नाही. महापालिकेकडून उपाययोजनेऐवजी फक्त जनजागृतीवर भर दिला जात असून, तो फार प्रभावी नसल्याचे दिसत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शहरातील रोगराई थांबत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यूSwine Flueस्वाईन फ्लू