शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:08 IST

दुष्काळ मागणी : प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, त्याला दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्हा तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारून बसलेल्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू करण्यात आले. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदि मागण्या यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्ते आवारात जमा झाल्यावर अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला; परंतु ते राजशिष्टाचाराला धरून नसल्याची बाब पुढे करीत अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळालाच दालनात येण्याची विनंती केली. त्यामुळे तणाव निर्माण होऊन अखेर आंदोलनकर्त्यांनी थेट पोर्चमध्येच ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. (प्रतिनिधी)आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यातसरकारचा निषेध म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन वीस ते पंचवीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.