कर्मचारी संघटनांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:01 AM2020-08-10T01:01:39+5:302020-08-10T01:02:02+5:30

कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.

Demonstrations by staff unions | कर्मचारी संघटनांची निदर्शने

केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप करीत निदर्शने करताना कामगार कृती समितीचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देकामगार धोरणाचा निषेध : विविध मागण्यांसाठी ठिकठिकाण आंदोलन

नाशिक : कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी हुतात्मा स्मारकाबाहेर गेटवर तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी असंघटित कामगार आणि सामान्य नागरिकांना दरमहा ७५०० रु पये आर्थिक मदत, मनरेगा मजुरांना ५०० रुपये, किमान वेतन व प्रत्येकी २०० दिवस काम द्या, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक ना शासकीय कर्मचारी दर्जा द्या, राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लॉकडाऊन काळातील कामगारांना संपूर्ण वेतन द्या, एलआयचे खासगीकरण रोखा, यांसह अन्य मागण्यांसाठी निदर्शने करण्यात
आली.
यावेळी सीटूचे डॉ. डी. एल. कराड, आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, व्ही. डी. धनवटे, सुनंदा जरांडे, श्यामसुंदर जोशी, अरु ण आहेर, मंगल भवर, विजय महाले, महादेव खुडे, मोहन देशपांडे, अरु ण म्हस्के, सीताराम ठोंबरे आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations by staff unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.