मनमाडला रिपाइंचे तलाठी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST2021-06-10T04:10:43+5:302021-06-10T04:10:43+5:30

मनमाड : महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणेबाबत काढलेल्या असंवैधानिक जीआरविरोधात, महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ...

Demonstrations in front of Manmadla Ripai's Talathi office | मनमाडला रिपाइंचे तलाठी कार्यालयासमोर निदर्शने

मनमाडला रिपाइंचे तलाठी कार्यालयासमोर निदर्शने

मनमाड : महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणेबाबत काढलेल्या असंवैधानिक जीआरविरोधात, महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीने मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेश गांगुर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा शहराच्या मुख्य मार्गावरून तलाठी कार्यालयात पोहोचला. कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंडल अधिकाऱ्यांना दिले. पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी गोरख चौधरी, संजय मुनोत, दीपक साळवे, पंचम ठाकूर, संजय गरुड, राजेंद्र धीवर, महम्मदभाई शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

मनमाड येथे रिपाइंच्यावतीने तलाठी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित वंदेश गांगुर्डे, गोरख चौधरी, दीपक साळवे, पंचम ठाकूर, संजय मुनोत आदी. (०९ मनमाड)

===Photopath===

090621\09nsk_11_09062021_13.jpg

===Caption===

०९ मनमाड

Web Title: Demonstrations in front of Manmadla Ripai's Talathi office