सुब्रह्मण्यम स्वामींच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:57 IST2019-07-09T18:56:52+5:302019-07-09T18:57:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात ...

Demonstrations against Subramaniam Swamy's protest | सुब्रह्मण्यम स्वामींच्या निषेधार्थ निदर्शने

सुब्रह्मण्यम स्वामींच्या निषेधार्थ निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात कॉँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजीरोड येथे निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी स्वामीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करीत निषेध केला. ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांनी स्वामी याचा डी.एन.ए. तपासून त्यांची डोके तपासणी करणे गरजेचे असल्याची टीका केली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारू, वत्सला खैरे, कुसुमताई चव्हाण, आशा तडवी, किरण जाधव, रामकिसन चव्हाण, अरुणा आहेर, ज्युली डिसूजा आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations against Subramaniam Swamy's protest