स्त्री भ्रूणहत्येविरोधात निदर्शने
By Admin | Updated: April 25, 2017 02:19 IST2017-04-25T02:18:59+5:302017-04-25T02:19:16+5:30
‘डॉ. वर्षा लहाडे यांना अटक करा’ अशा विविध घोषणा देत राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसतर्फे सोमवारी (दि.२४) दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.

स्त्री भ्रूणहत्येविरोधात निदर्शने
नाशिक : ‘स्त्री भ्रूणहत्या थांबल्याच पाहिजे’, ‘डॉ. वर्षा लहाडे यांना लवकरात लवकर अटक करा’ अशा विविध घोषणा देत राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसतर्फे सोमवारी (दि.२४) दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तालयातही डॉ. वर्षा लहाडे यांना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीचे निवेदन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, भारती पवार, अनिता भामरे, सायरा शेख आदिंसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.