गणेशोत्सवकाळात गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:32 PM2019-09-05T22:32:34+5:302019-09-05T22:33:40+5:30

सिन्नर : ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, शिवरायांच्या विचारांची जपणूक व्हावी तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळावा, या उद्देशाने मोहदरी येथील ब्रेव्हझ इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये चिमुकल्यांसाठी गडकिल्ले बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिवकाळाशी एकरूप होत पाच दिवसांच्या परिश्रमानंतर आकारास आलेल्या या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गणेश स्थापनेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे प्रदर्शन पालकांसह इतर शाळांनाही खुले करण्यात आले आहे.

Demonstration of thunderstorms during the Ganesh festival | गणेशोत्सवकाळात गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील ब्रेव्हझ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गडकिल्ल्यांची पाहणी करताना अध्यक्ष व्हिनस वाणी, स्नेहा वाणी, समन्वयक मोहिनी कुंभारे, मुख्याध्यापक मीनल देवरे आदी.

Next
ठळक मुद्देकाळी माती, बारदान, लाकूड, रद्दी पुठ्ठे, कागद आदी वस्तूंचा वापर

सिन्नर : ऐतिहासिक मूल्यांची जपणूक व्हावी, शिवरायांच्या विचारांची जपणूक व्हावी तसेच नवनिर्मितीचा आनंद मिळावा, या उद्देशाने मोहदरी येथील ब्रेव्हझ इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये चिमुकल्यांसाठी गडकिल्ले बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिवकाळाशी एकरूप होत पाच दिवसांच्या परिश्रमानंतर आकारास आलेल्या या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गणेश स्थापनेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे प्रदर्शन पालकांसह इतर शाळांनाही खुले करण्यात आले आहे.
थर्माकोल किंवा अन्य पर्यावरणास घातक असलेल्या वस्तूंना दूर सारत पर्यावरणपूरक वस्तूंपासून किल्ले बनविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक स्नेहा वाणी यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काळी माती, बारदान, लाकूड, रद्दी पुठ्ठे, कागद आदी वस्तूंचा वापर करून शालेय वेळेत तब्बल चार दिवस परिश्रम घेत रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड हे चार किल्ले साकारले. रंगकामासाठी फळे, फुले आणि पानांचा उपयोग करण्यात आला.
याशिवाय छत्रपती शिवरायांचा शासन दरबार देखावा, शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आदी प्रतिकृतीही साकारल्या. गडाची तटबंदी, बुरु ज, मुख्य दरवाजा, राजाचा दरबार, खलबतखाना, शस्त्रागार, धान्याची कोठारे, बाजारपेठा, घोड्याची पागा, राणीचा महल आदी बारकावे विद्यार्थ्यांना या नवनिर्मितीच्या निमित्ताने शिक्षकांकडून माहिती झाले. प्रत्येक गडाची महती, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची जाणीव, त्यासाठी उपसलेले कष्ट, लढलेल्या लढाया यांचीही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रदर्शन बघणाऱ्यांनाही या किल्ल्यांची माहिती आणि महती कळावी यासाठी प्रत्येक किल्ल्याजवळ माहितीफलक लावण्यात आले आहेत.
शालेय वेळेत सकाळी १० ते दुपारी १ या काळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. ब्रेव्हझ स्कूलचे अध्यक्ष व्हिनस वाणी, संचालक स्नेहा वाणी, समन्वयक मोहिनी कुंभारे यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेले गडकिल्ले बघून त्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. गडकिल्ल्यांची कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक मीनल येवलेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका ऋतिका मुळे, वैशाली मोहदवे, मानसी तांडेल आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Demonstration of thunderstorms during the Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा