वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने

By Admin | Updated: August 6, 2014 01:59 IST2014-08-06T01:49:59+5:302014-08-06T01:59:17+5:30

वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने

Demonstration of Medical Sales Representatives | वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने

वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने

 

नाशिक : वैद्यकीय विक्री प्रतिनिधींच्या कामाच्या वेळेच्या निश्चितीबाबत तातडीने अधिसूचना काढावी, या मागणीसाठी सीटू संलग्न महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शासनाने विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळेच्या निश्चितीबाबत जानेवारी २०१४ मध्ये अधिसूचना जारी केली होती. परंतु अद्यापही अंमलबजावणी होत नाही. शासनाने तातडीने पावले उचलून कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstration of Medical Sales Representatives