देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:51 IST2019-06-17T14:49:48+5:302019-06-17T14:51:02+5:30
देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रु पांतर होउन चार वर्ष झाली, तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचार्यांचे समावेशन करणे या व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रु पांतर होउन चार वर्ष झाली, तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचार्यांचे समावेशन करणे या व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने अध्यक्ष सुधाकर आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचा-यांचे नगरपंचायतमध्ये सरसकट समावेशन करण्यात यावे. सफाई विभागातील ठेका पष्दत रद्द करणेत येवून सफाई कर्मचा-यांचे समावेशन करण्यात यावे, नगरपंचायत उद्घोषणेनंतरील कर्मचा-यांचे विनाअट विनाशर्त समावेशन करण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचा-यांचे शिक्षणाच्या अटी रद्द करून अपात्रतेची अट रद्द करून पाणीपुरवठा व्हॉल्व मन, ड्राइव्हर, इलेक्तिट्रशियन, पंप आॅपरेटर, गाळणी चालक, शिपाई, क्लार्क यांचे त्याच पदावर समावेशन करणेत यावे, तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचा-यांची जुनी सेवा धरून नगरपंचायतमध्ये पेन्शन व फरक मिळवा, रोजंदारी व कायम नसलेल्या कर्मचा-यांचे समावेशन करावे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात दत्तात्रय बच्छाव, सुरेश आहेर, दिपक गोयल, सुनिल शिलावट, वसंत आहेर, शांताराम घुले, विकास आहेर, माणिक अहेर, राजेंद्र शिलावट, जागृती गोयल, सुशिला घोडेस्वार, धनुबाई गोयल, हौशाबाई साळुंके, विमल देवरे आदी देवळा देवळा नगरपंचायतीचे पुरु ष व महीला कर्मचारी सहभागी झाले होते.