शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 17:31 IST

मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील  लाठिमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौगांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देछात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी शिक्षकांवरील लाठीमाराचा छात्रभारतीकडून निषेध

नाशिक: मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील  लाठिमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौगांना ताब्यात घेतले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांविषयी ठोस आश्वासन न दिल्याने सोमवारी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण केला. १०० टक्के अनुदानाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देत शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ च्या  मोर्चा वळविला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीमार केले.  या घटनेचा राज्यभरात निषेध होत असताना पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नाशिकमध्येही मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फेफडणवीस यांच्या पुतळ््याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करू न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळयाचे दहन केले.त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांपैकी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष समाधान बागूल, राज्य सदस्य राकेश पवार, राम सूर्यवंशी व सदाशीव गणगे या  चौघांना ताब्यात घेतले असून सायंकाळी उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकagitationआंदोलनStudentविद्यार्थी