शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

देशातील लोकशाही चिरकाळ टिकेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:43 IST

देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे.

लोकमत सर्वेक्षणनाशिक : देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे. अर्थात, अशा प्रकरच्या वातावरणातही ६२ टक्के युवकांना कोणत्याही विषयावर मते मांडण्याची भीती वाटत नाही किंवा ते परखडपणे मांडू शकतात, असे त्यांचे मत आहे. तर देशातील स्थिती काहीही असली तरी अन्य देशांच्या तुलनेत भारतच सर्वश्रेष्ठ असून नागरिक मुक्तपणे आपले विचार मांडू शकतात आणि त्यामुळेच देशात लोकशाहीच टिकेल असे मत ६६ टक्के युवावर्गाने दाखवित देशाच्या राज्यघटनेवर संपूर्णपणे विश्वास व्यक्त केला आहे.शात प्रजासत्ताक आहे आणि देशाची घटनादेखील आदर्श आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांपासून देशातील वातावरणाविषयी वेगळीच चर्चा सुरू असते. ती राजकीय असते आणि परिपक्व समाजाचीही असते. खरे तर राजकीय वादविवादापासून युवा पिढी तितकीशी जोडलेली नसते. त्यांचे विश्व वेगळे तर आहेच परंतु त्यांचे स्वत:चे असे विचारही असतात. विशेषत: जगात सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश म्हणून भारताचा परिचय आहे, अशावेळी देशात चर्चिल्या जात असलेल्या वातावरणाविषयी युवा पिढीचे मत काय आहे, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता त्यांची परखड मते स्पष्ट झाली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने महाविद्यालयीन युवकांना बोलते केले. शहराच्या विविध भागांतील महाविद्यालयांत जाऊन शंभर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून तर घेतले, परंतु त्याचबरोबर त्यांची वेगळी मतेही जाणून घेतली. देशात राजकीय नेत्यांचे मतभेद असतात. परंतु त्यासाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लागेल अशाप्रकारचे वर्तन करू नये,राजकीय वादात लोकांची मने मात्र कलुषित होतात. ती होऊ देऊ नये तसेच सर्वांना समान न्याय मिळावा अशाप्रकारच्या अपेक्षाही युवा पिढीने व्यक्त केल्या. तर समृद्ध लोकशाहीसाठी नागरिकांनीदेखील कर्तव्य पाळली पाहिजेत. विशेषत: जातीभेद किंवा अन्य कोणतेही भेद पाळता कामा नये, लोकांनी कायद्याचे पालन केल्यासचे कायद्याचे राज्य अवतरू शकेल असेही मत व्यक्त करण्यात आले.देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यानंतर मात्र समाजात मतभेद निर्माण झाले. ते जातीवरून असो की, अन्य कारणावरून असो. परंतु हे मत संपत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्याची खरी जाणीव होणार नाही आणि मतभेद दूर होतील तेव्हाच शंभर टक्के लोकशाही आहे, असे वाटेल.  - मानसी मुंढे, आर.वाय.के. कॉलेजकोणत्याही शारीरिक, मानसिक आणि अन्य दुर्बलांवर भाष्य करणे म्हणजे स्वातंत्र्य नाही आणि लोकांचे प्रश्न दडपले गेले तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. अशा राजकारणाला हुकूमशाही म्हटले जाते.  - भागश्री गवळे, एनबीटी लॉ कॉलेजदेशातील महिला या शंभर टक्के आपल्या स्वेच्छेने वागण्यासाठी मुक्त असल्या पाहिजे. देशात आजही महिलांना आपले मत मांडण्याचा मुळीच अधिकार नाही. स्त्री आरक्षणाइतकेच स्त्री संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.- सारिका चव्हाण, एच.पी.टी. कॉलेजदेशात सामान्य नागरिकांवर अनेक निर्बंध येत असल्याने देशात लोकशाही कमी होत चालली आहे. आता हुकूमशाही नेता उदयास येते की काय अशीही शंका व्यक्त केली जात आहे.- प्रियांका सूर्यवंशी, के. टी. एच. एम. महाविद्यालयदेशाला स्वातंत्र्य आहे, परंतु मुली आणि स्त्रियांना नाही हे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आवर्जुन जाणवते. मुली आणि महिलांवर अजूनही अत्याचार होत आहे आणि त्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रजेची सत्ता असताना महिलांना अधिकार आहे काय, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे.  - पूजा पगारे, एच. पी. टी. कॉलेज

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक