लासलगाव पाणीपट्टी माफ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:02+5:302021-06-23T04:11:02+5:30
मार्च ते मे २०२१ मध्ये फक्त सहा वेळा पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे पाणी बिल माफी करावे अशी ...

लासलगाव पाणीपट्टी माफ करण्याची मागणी
मार्च ते मे २०२१ मध्ये फक्त सहा वेळा पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे पाणी बिल माफी करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील यांनी ग्रामसेवक शरद पाटील यांच्याकडे केली आहे.
लासलगाव ग्रामपालिका सोळा गाव पाणीपुरवठा योजनाव्यतिरिक्त अन्य जलपुरवठ्याचे साधन नाही . गावाची लोकसंख्या अंदाजे २० ते २५ हजार आहे . वारंवार पाणीपुरवठा योजना पूर्णपणे विस्कळीत होत असल्याने सातत्यपूर्ण पाणीपुरवठा होत नाही . ग्रामपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व रहिवाशांचे वेळोवेळी विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे तक्रारी वाढत आहेत. सद्यस्थितीत कोरोना काळ व लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. त्यामुळे मार्च ते मे २०२१ या काळातील नागरिकांचे पाणी बिल माफ करावे अशी मागणी केली जात आहे.