शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

अपहरण करून दोन लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:13 IST

दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़

नाशिक : दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़  अंबडमधील सनशाइन पार्कमधील नूरउल्ला मतीउल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित फकरुद्दीन खान हा तीन महिन्यांपासून फोनवर धमक्या देऊन पैशांची मागणी करीत होता़ यानंतर रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास संशयित फकरुद्दीन व त्याच्या दोन मित्रांनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनातून नूरउल्ला खान यास घेऊन जात अंबड लिंक रोडवरील गुदामामध्ये डांबून ठेवत दोन लाखांची मागणी केली़  याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कत्तलीसाठीच्या गायींची सुटकावडाळा नाका येथील कसाई वाड्यात कत्तलीसाठी बांधलेल्या तीन गायींची भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास सुटका केली़ याप्रकरणी पोलिसांनी संशयित नवाब अब्दुल रहमान कुरेशी (रा. कुरेशीवाडा, वडाळा नाका) यास अटक केली असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चौघा जुगाऱ्यांवर कारवाईदेवी चौकात जुगार खेळणाºया चौघांना पोलिसांनी रविवारी (दि़२९) सायंकाळी ताब्यात घेतले़ उमेश धनगर (४३, रा. सिन्नर फाटा), हारून भिकन शेख (४३), दिलावर अब्दुल पठाण (४३, दोघे रा. सिन्नर फाटा), सचिन कैलास सोनवणे (३४, रेल्वे क्वार्टर, नाशिकरोड) हे पत्त्यांवर जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघा संशयितांकडून ५७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विनयभंग करून दिली धमकीघरी आलेल्या पाहुण्यास चहा करण्यासाठी स्वयंपाकगृहात गेलेल्या महिलेचा पाहुण्याने विनयभंग करून धमकी दिल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली़ याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित अनिल संपत वाटपाडे (रा. पाचोरे वणी, ता. निफाड) विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पानटपरी फोडून चोरीकॉलेजरोडच्या थत्तेनगररोडवरील विनय अपार्टमेंटमधील दुर्गा पान शॉप फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व डीव्हीआर असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ याप्रकरणी दिवाकर रुक्मैया कलाल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गोमांस विक्रेत्यास अटक४भद्रकाली परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री करीत असलेल्या शकील रशीद शेख (२२, रा. नानावली, भद्रकाली) या संशयितास रविवारी (दि़२९) दुपारी पोलिसांनी अटक केली़धात्रक फाटा येथून दुचाकीची चोरीआडगावच्या धात्रक फाट्यावरील नवआकाश सोसायटीतील रहिवासी महेंद्र पांडुरंग सूर्यवंशी यांची ७० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५, जीजे २३९५) सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे