तहसीलदाराची बदली रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:52 IST2018-08-28T00:51:57+5:302018-08-28T00:52:20+5:30
: तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

तहसीलदाराची बदली रद्द करण्याची मागणी
नाशिक : तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. अहिरराव यांनी नाशिक तहसीलची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम केले असून, त्यांची लोकप्रियता त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तालुक्यातील राजकीय महत्त्वाकांक्षी पुढाºयांनी प्रशासनावर दबाव आणून त्यांची बदली केली असल्याने राजकीय दबावाला भीक न घालता त्यांची अन्यायकारक बदली तत्काळ रद्द करून त्यांना पूर्वाश्रमीच्या पदावर पुनर्स्थापित करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले व शिष्टमंडळाने काही ग्रामपंचायतींच्या ठरावांसह जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, शिवा तेलग, शिवाजी मोरे, संतोष माळोदे, विकास काळे, हिरामण खोसकर, ढवळू पसारे, कैलास बेडकुळे आदी उपस्थित होते.