सफाई कर्मचाºयांच्या बदल्या रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:02 IST2018-02-24T01:02:44+5:302018-02-24T01:02:44+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for transfer of cleaning personnel | सफाई कर्मचाºयांच्या बदल्या रद्दची मागणी

सफाई कर्मचाºयांच्या बदल्या रद्दची मागणी

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, बदली आदेशात बºयाच महिला, अपंग सफाई कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच नुकत्याच सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बदल्या या कुठल्याही शासन आदेशान्वये करण्यात आलेल्या नाहीत, तरीदेखील कर्मचाºयांना विभागीय कार्यालयांमार्फत रुजू होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मानकानुसार, दहा हजार लोकसंख्येमागे २५ सफाई कर्मचारी याप्रमाणे ३,७१७ कर्मचारी अपेक्षित आहेत. परंतु, आस्थापना परिशिष्टावर १,९९३ कर्मचारी मंजूर आहेत. त्यामुळे नव्याने भरती करण्याची गरज आहे. सदर सफाई कर्मचाºयांच्या बदल्या त्वरित रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल बहोत यांनी केली आहे. 

Web Title: Demand for transfer of cleaning personnel