थकबाकीदारांच्या शेतजमिनींचे लिलाव थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:18 IST2021-03-17T20:39:58+5:302021-03-18T00:18:06+5:30

येवला : नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्चला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. सदर शेतजमिनीचे लिलाव थांबवावे अन्यथा कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Demand to stop auction of arrears of agricultural land | थकबाकीदारांच्या शेतजमिनींचे लिलाव थांबविण्याची मागणी

थकबाकीदारांच्या शेतजमिनींचे लिलाव थांबविण्याची मागणी

ठळक मुद्देशेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन

येवला : नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्चला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. सदर शेतजमिनीचे लिलाव थांबवावे अन्यथा कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देत शेतकऱ्यांची कैफीयत मांडली. राष्ट्रीयीकृत बँकांनी योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, व्याज माफ करून बऱ्याच शेतकऱ्यांना मुद्दल रकमेत सुद्धा काही प्रमाणात सूट दिली. मात्र, शेतक-यांनी स्थापन केलेल्या नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी मुक्त बँक करण्याचे धोरण राबवत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून विज वितरण कंपनीही वीजबिलांची वसुली करत आहे. वीज वितरण कंपनीनेही वीजपुरवठा तोडण्याची मोहिम तात्काळ थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, रामकृष्ण बोंबले, शंकराव पुरकर, शंकराव ढिकले, बाळासाहेब गायकवाड, अरुण जाधव, देविदास पवार, बापूसाहेब पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अन्यथा आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेशी शेतकरी संघटना पदाधिकार्‍यांनी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांच्या बाबतीत योग्य मार्ग काढावा असे आवाहन केले. अन्यथा १९ मार्चला नाशिक जिल्हा बँकेवर थकीत कर्जदार शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला.

Web Title: Demand to stop auction of arrears of agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.