कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST2021-04-11T04:14:43+5:302021-04-11T04:14:43+5:30

गर्दीबाबत कठोर निर्णय घ्यावा नाशिक : बाजार समिती आवारात लिलावाच्यावेळी होणाऱ्या गर्दीला अटकाव करावा यासाठी बाजार समिती प्रशासनाने कठोर ...

Demand to start Kovid Center | कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

गर्दीबाबत कठोर निर्णय घ्यावा

नाशिक : बाजार समिती आवारात लिलावाच्यावेळी होणाऱ्या गर्दीला अटकाव करावा यासाठी बाजार समिती प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

छोट्या व्यावसायिकांवर बंदचा परिणाम

नाशिक : सततच्या बंदमुळे छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक विक्रेत्यांचा दिवसभराच्या व्यवसायावरच उदरनिर्वाह चालतो. बंदमुळे त्यांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे.

महागाईमुळे अनेकांचे बजेट कोलमडले

नाशिक : तेल, तुपाबरोबरच भजीपालाही महागल्याने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Demand to start Kovid Center