पेठची औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:14 IST2020-09-09T23:00:45+5:302020-09-10T01:14:44+5:30
पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

पेठची औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देतांना हिरामण खोसकर, सुनिल भूसारा, गिरीश गावीत आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ हा आदिवासी बहुल तालुका असल्याने स्थानिक रोजगाराची कोणतीही व्यवस्था नाही. गत ३० वर्षापासून पेठ येथील औद्योगिक वसाहत धुळखात पडली असून महाराष्ट्र व गुजरात राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही वसाहत असून सध्या दळणवळण व पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने येथे छोटे मोठे उद्योग सुरू करून स्थानिक रोजगाराला चालना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, आमदार सुनिल भूसारा, पेठ तालुका युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश गावीत आदी उपस्थित होते.