करंजीत मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:56 IST2021-01-20T21:39:09+5:302021-01-21T00:56:29+5:30
सायखेडा : सिन्नर ते करंजी मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

करंजीत मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी
सायखेडा : सिन्नर ते करंजी मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
करंजी, तामसवाडी, तारुखेडले, खानगाव, मांजरगाव या गावच्या विद्यार्थ्यांची बस बंद असल्याने शाळा-कॉलेजला जाण्यासाठी गैरसोय झाली. बस सुविधा उपलब्ध नसल्याने ६० ते ७० मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले. यावेळी शरद शिंदे, प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, सिन्नर तालुका उपाध्यक्ष सुनील जगताप, तालुकाध्यक्ष अमोल ब्राह्मणे, संपर्कप्रमुख किशोर शिंदे, रोहित वैद्य, अविनाश सांगळे, संदीप लोंढे, ऋषिकेश वाघ, रोहन पगारे, गणेश आव्हाड आदी उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत सदर बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन काळे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.