बचत गटांना माल विक्रीसाठी स्टॉलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:05 IST2020-12-10T19:33:00+5:302020-12-11T01:05:22+5:30

पेठ : तालुक्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी पेठ शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Demand for stalls for sale of goods to self-help groups | बचत गटांना माल विक्रीसाठी स्टॉलची मागणी

पेठ येथे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांना निवेदन देतांना महेश टोपले व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी.

ठळक मुद्देपेठ : महिला मंडळाने घेतली तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट

पेठ : तालुक्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी पेठ शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिला मंडळाने तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांची भेट घेऊन चर्चा केली. पेठ तालुक्यात जंगल संपत्ती अजूनही अबाधित असल्याने महिला बचत गट निरगुडी तेल, मशरूम, विविध प्रकारचे लोणचे यासह बांबूपासून वस्तू तयार करतात. अशा उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून शहरात स्टॉल मिळावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी कृषी व बचत गट मार्गदर्शक महेश टोपले तसेच तालुक्यातील महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या.

 

Web Title: Demand for stalls for sale of goods to self-help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.