शहरात कोविड सेंटर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:35 IST2020-09-22T17:32:20+5:302020-09-22T17:35:41+5:30

मनमाड : शहरात कोरोना रु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे त्विरत डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारावे. येत्या ३ दिवसांत योग्य कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरु पाचे जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. आघाडीतर्फे या बाबतचे निवेदन मनमाड उपजिल्हा रु ग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. गोविंद नरवणे यांना देण्यात आले आहे

Demand for setting up of Kovid Center in the city | शहरात कोविड सेंटर उभारण्याची मागणी

मनमाड येथे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निवेदन देताना राजेंद्र पगारे, पी.आर निळे, कादीर शेख, संतोष भोसले, सुरेश जगताप, यशवंत बागुल आदी.

ठळक मुद्देमनमाड : बहुजन वंचित आघाडीचे शासनाला निवेदन

मनमाड : शहरात कोरोना रु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे त्विरत डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारावे. येत्या ३ दिवसांत योग्य कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरु पाचे जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. आघाडीतर्फे या बाबतचे निवेदन मनमाड उपजिल्हा रु ग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. गोविंद नरवणे यांना देण्यात आले आहे.
मनमाड शहरात कोरोनाच्या महामारी ने थैमान घातले असून रु ग्ण संख्या ६५० च्यावर गेली आहे. आॅक्सिजन बेडयुक्त कोविड सेंटर उभारण्याचे आदेशच देण्यात आले होते. मात्र, या आदेशाला सरकारी यंत्रणेने केराची टोपली दाखवली व मनमाड शहरात अजूनही कोविड सेंटर उभारले नाही. मात्र, यामुळे येथील जवळपास १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्र वारी (२५ सप्टेंबर) रोजी तीव्र स्वरु पाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख राजेंद्र पगारे, पी.आर निळे, कादीर शेख, संतोष भोसले, सुरेश जगताप, यशवंत बागुल, उमेश भालेराव, कैलास शिंदे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Demand for setting up of Kovid Center in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.